कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाह आरोग्य प्रशासनाला दिलासा मिळत आहे. काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ३६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ५६३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १८२७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ९९, आजरा तालुक्यातील ७, भूदरगड तालुक्यातील २३, चंदगड तालुक्यातील १३, गडहिंग्लज तालुक्यातील ३७, हातकणंगले तालुक्यातील २२, कागल तालुक्यातील ९, करवीर तालुक्यातील ३३, पन्हाळा तालुक्यातील २०, राधानगरी तालुक्यातील ८, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४७    आणि इतर जिल्ह्यातील ३५ अशा एकूण ३६१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ५६३ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान, तब्बल १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४२,४३७.    

एकूण डिस्चार्ज ३१,४७२.  

उपचारासाठी दाखल रुग्ण ९६१२.

तर कोरोनामुळे आजअखेर जिल्ह्यात १३५३ एकुण मृत्यू झाले आहेत.