कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभरात ३५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९०२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ११, आजरा तालुक्यातील २ ,  गडहिंग्लज तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १ इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा एकूण २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९,१८६

एकूण डिस्चार्ज : ४७,२४८

उपचारासाठी दाखल रुग्ण : २५१

एकूण मृत्यू : १६८७