कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात २९६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३६२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९९८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ८०, आजरा तालुक्यातील १, भूदरगड तालुक्यातील १०, चंदगड तालुक्यातील ८, गडहिंग्लज तालुक्यातील १०, हातकणंगले तालुक्यातील ४०, कागल तालुक्यातील ७, करवीर तालुक्यातील ४७, पन्हाळा तालुक्यातील ५, राधानगरी तालुक्यातील ३, शाहूवाडी तालुक्यातील ७, शिरोळ तालुक्यातील १७ ,इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४१ आणि इतर जिल्ह्यातील २० अशा एकूण २९६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३६२ जण कोरोनामुक्त झालेतं.
दरम्यान, कोल्हापूर शहरातील बुधवार पेठ येथील १, हातकणंगले तालुक्यातील २, इचलकरंजी परिसरातील २, गडहिंग्लज तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील ३, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील १, निपाणी बेळगाव मधील १, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ अशा तब्बल १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४५,३५५.
एकूण डिस्चार्ज ३५,२२६.
सध्या उपचारासाठी दाखल रुग्ण ८६५०.
आजअखेर कोरोनामुळे एकूण मृत्यू १४७९ झाले आहेत.