राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी येथील सुरेखा संजय रायकर या विवाहितेने १२ सप्टेंबर २०२१ रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा २२ सप्टेंबर रोजी सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सुरेखाला दोन मुलीच झाल्याने तिचा सासरकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता.

या सर्व प्रकाराला कंटाळून सुरेखाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती आणि सासूच्या विरोधात सुरेखाची आई अंबूबाई सावंत यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पती संजय रायकर आणि सासू लक्ष्मी रायकर या दोघांविरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी पतीला अटक केली आहे.