कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाचा कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहण्यासाठी प्रयत्नशील असून कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याचा इशारा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज (गुरुवार) पत्रकारांशी बोलताना दिला.

 

दरम्यान, भ्रष्टाचार प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास त्याच्यांवर शिस्तभंगासह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही यावेळी आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. तर घरफाळा घोटाळ्यासंदर्भात आयुक्तांना विचारले असता यासंबंधी समितीच्या वतीने चौकशी सुरू असून संबंधित दोषींवर कारवाई होणार असल्याचे   बलकवडे यांनी यावेळी सांगितले.