मुंबई – बॉलीवूडची सर्वात क्युट आणि प्रसिद्ध जोडीमध्ये आलिया भट आणि रणबीरर कपूर याचं नाव समावेश आहे. दोघांनी अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केला आहे. दोघांचा ब्रह्मास्त्र या सिनेमाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. दोघं आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. दोघेही आपल्या कुटुंबियांशी खूप जवळचे आहेत. नेहमी दोघं आपल्या कुटुंबासोबत कार्यक्रमांमध्ये किंव्हा रेस्टॉरंट मध्ये जात असताना पाहायला मिळतात. अशातच रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर हिने वहिणी आलीया सोबत तिचं नातं कसा आहे याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

रिद्धीमा म्हणाली तिचे आणि आलियाचे नाते खूप चांगले आहे. दोघींमध्ये उत्तम समीकरण आहे. तिला आलियाचा आवाज खूप आवडतो, ती अतिशय शांत स्वभावाची आहे.आलिया घरात कोणतेही राजकारण करत नाही ना तिला गॉसिपिंग आवडतं. आमच्या दोघींमध्ये खूप समीकरण आहे. त्यामुळे मला आलीया आवडते. अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झालं होतं तेव्हा आलियाने कपूर कुटुंबाची साथ सोडली नव्हती.

रिद्धीमा कपूर अभिनेत्री नसली तरीही कपूर कुटुंबियांची मुलगी असल्यामुळे तीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. रिद्धीमा ही लवकरच अभिनयामध्ये पदार्पण करणार आहे. फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड बॉईज सीजन 3 मध्ये रिद्धीमा मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. रिद्धीमा एक प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आहे.रिद्धीमा हिचे लग्न उद्योगपती भरत सहानी यांच्या सोबत झाला आहे. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. रिद्धीमा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग फार मोठी आहे