कोल्हापूर (प्रतिनिधी) : तुकाराम दत्तात्रेय उर्फ टी. डी कुलकर्णी (वय ९१) यांचे आकस्मिक वृद्धापकाळाने निधन झाले.  ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे मानद सचिव होते. त्यांनी येरवडा कारागृहाचे अधिकारी म्हणून काही काळ काम केले. शिवाय कोल्हापूर ग्राहक पंचायत समितीचे संस्थापक सदस्य होते. शा. कृ. पंत वालावलकर ट्रस्ट वरती  विश्वस्त म्हणूनही त्यांनी कामकाज केले.

त्यांनी नामवंत साहित्यिक कोल्हापुरात आणून त्यांची व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर सेवानिवृत्ती घेऊन त्यांनी मे. जय भवानी आयर्न वर्क्स नावाची फौंड्री सुरू केली. गिरीश कमलाकांत कुलकर्णी किडनी फाउंडेशनचे ते ट्रस्टी होते. कोल्हापूर उद्योग जगतात एक अभ्यासू व्यक्तिमत्व, चालता बोलता इतिहास म्हणून सर्वांना सुपरिचित होते.  कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे मानद खजिनदार कमलाकांत कुलकर्णी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातू, नात, पणती असा परिवार आहे.