कोतोली (प्रतिनिधी) : तिरपण (ता. पन्हाळा) येथील सरकारमान्य रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून गावातील कोरोनाबाधित लाभार्थ्यांना घरपोच रेशन धान्य वाटप करण्यात आले.

येथील तानाजी शंकर पाटील हे गावातील रेशन धान्य दुकान चालवतात. काही दिवसांपूर्वी या महिन्यातील रेशन दुकानात आले होते. रेशन वाटपाच्या वेळी गर्दी होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करून लाभार्थ्यांना रेशन वाटप करण्यात आले. मात्र, गावातील ज्या घरामध्ये कोरोना रुग्ण आहेत. अश्या घरातील इतर लोक होम क्वांरनटाईन असल्यामुळे त्यांच्या घरातील लाभार्थ्यांना रेशन धान्य घेवून जाण्यास अडचण येत होती. हीच अडचण लक्षात घेऊन गावातील सदाशिव पाटील, दगडूबाई पाटील, भारत यादव, दावीद वांद्रे, आदम वांद्रे व बंडोपंत वांद्रे या लाभार्थ्यांना घरपोच रेशन धान्य देण्यात आले. रेशन धान्य वाटपावेळी पोलीस पाटील वर्षा कांबळे, संदीप पाटील, सर्जेराव माने, बाजीराव पाटील व पवन पानारी उपस्थित होते.