पुणे ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण व सामाजिक समानतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मंगळवारी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

कोयासन विद्यापीठाच्या 120 वर्षाच्या इतिहासात मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत. मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून देवेंद्रजींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आहे.

जलसुलभता आणि सामाजिक ऐक्यासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. महाराष्ट्र आणि जपान यांचे नाते दृढ करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे. आपले राज्य परकीय गुंतवणूक करण्यात आघाडीवर असून त्यात जपानने सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली असल्याचे ते म्हणाले.