सावरवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी महे (ता. करवीर) येथील प्रसिद्ध किर्तनकार  हभप विठ्ठल गावडे यांची निवड करण्यात आली. महामंडळाच्या राज्य कौन्सिलच्या व्यापक बैठकीत ही निवड झाली.

हभप विठ्ठल गावडे यांनी गेली तीन दशके वारकरी संप्रदायामध्ये योगदान दिली, प्रवचन, किर्तन, दिंडी सोहळे, भजन भारूड, काकडा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळे आदी धार्मिक कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे. यावेळी राज्याध्यक्ष आर. के. शेटे , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सदाशिव नाळे, उदय पाटील आदी उपस्थित होते.