कोल्हापूर (प्रतिनिधी) : किराणा मालाच्या दुकानामध्ये गुटखा व सुगंधी पान मसाल्याचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या एकास राजारामपुरी पोलिसांनी आज (गुरुवार) सायंकाळी अटक केली. मंदार निरंजन ऐनापुरे (वय ३३, रा. म्हाडा कॉलनी, एसएससी बोर्डजवळ) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधी सुपारी, पानमसाला असा २५ हजार ५९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंदार ऐनापुरे हा किराणा मालाच्या दुकानांमध्ये गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या दुकानातील विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला, तंबाखू,  सुगंधी सुपारी असा २५, ५९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.