कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची ११३ वी जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी साजरी करण्यात आली. प्रथम कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, किशोर खानविलकर, संजय पवार वाईकर, रंगराव देवणे, हेमलता माने, मतीन शेख, अर्जुन सकटे, उदय गीते, कुणाल भोसले, राजू मुल्ला, रियाज चिकोडे कबनूर, अन्वर शेख मधुकर पाटील, युवराज पाटील, बाबूराव कांबळे इत्यादी उपस्थित होते.