नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) शेतकरी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी दिल्ली सीमेजवळ तळ ठोकून आहेत. सरकारच्या मंत्र्यांशी चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत, मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, आज पंतप्रधान मोदींचे ट्विट आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांनपासून सुरु असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे.

पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमचे सरकार देशभरातील शेतकरी बंधू आणि भगिनींच्या कल्याणाशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. बुधवारी रात्री शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत केंद्र सरकारने उसाच्या खरेदीत प्रतिक्विंटल 25 रुपयांची वाढ केली आहे. यानंतर आता साखर कारखानदार उसाची एफआरपी 10.25 टक्के वसूल करून 340 रुपये प्रतिक्विंटल दर देतील.

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींचे ट्विट

शेतकरी आणि सरकारमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचे हे ट्विट अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. PM मोदींनी त्यांच्या X हँडलवरून लिहिले की, आमचे सरकार देशभरातील आमच्या शेतकरी बंधू-भगिनींच्या कल्याणाशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे.

या संदर्भात ऊस खरेदीच्या दरात ऐतिहासिक वाढ मंजूर करण्यात आली आहे. या पावलामुळे आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करोडो फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ट्विटला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले होते.