कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि गोकुळ मुबई शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुंढे यांनी, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सहकारी दुग्धव्यवसायामध्ये गोकुळचे नाव आदर्शवत असल्याचे म्हणाले.

तुकाराम मुंढे म्हणाले की, गोकुळ हा दुग्ध व्यवसायातील एक नावाजलेला ब्रँड आहे. तो योग्य नियोजन,शासन यंत्रणेची मदत व संघानियमांची अमलबजावणी, दूध उत्पादक केंदबिंदू मानून होत असलेले दैनंदिन कामकाजामुळेच हा संघ सहकारातील आदर्श संस्था बनला आहे. गोकुळ राबवत असलेली वासरू संगोपन योजनेचे कौतुक करत गोकुळच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागामार्फत कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास मला संपर्क करा, मी गोकुळच्या हितासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी, सध्याच्या दुग्ध व्यवसायाच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. तसेच गोकुळ दूध संघ कामकाज, दूध संस्था,दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दराबाबत, सेवा सुविधा, संकलन यंत्रणा, दूध वितरण आणि पशुसंवर्धन सुविधांची माहिती दिली. तसेच गोकुळसारख्या शेतकरीभिमुख असणाऱ्या संस्थेस निश्चितच विशेष भेट देऊ, असे आश्वासन दिले.