कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड बँकेच्या चेअरमनपदी अनिल बाबूराव सोलापूरे आणि व्हाईस चेअरमनपदी रंजना कृष्णात तवटे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल गोकुळ दूध संघाच्यावतीने संघाचे माजी चेअरमन आणि जेष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते संचालक मंडळ सभेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघाचे संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, विश्वास जाधव, संचालक धैर्यशील देसाई, बाळासो खाडे, रामराजे कुपेकर, दिपक पाटील, पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, उदय पाटील, बाबा देसाई, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, सचिव एस. एम. पाटील आदी उपस्थित होते.