पणजी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण मिळाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून त्याची लागण  लागण झालेले रुग्ण गोव्यात येऊ नये म्हणून गोवा सरकारने सीमा मार्गावर कडक तपासणी सुरू केली आहे.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज (शनिवार) स्वत: काही चेक नाक्यावर भेट देऊन पाहणी व तपासणीचा आढावा घेतला. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, डेल्टा प्लसची प्रकरणे शेजारील राज्यात वाढत चालल्याने त्याचा प्रसार गोव्यात होऊ नये म्हणून आमच्या सरकारने सर्व चेक नाक्यावर कडक तपासणी सुरू केली आहे. गोव्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कोविड निगेटिव्ह  असेल यासाठी सरकार सतर्कता बाळगत आहे. त्यासाठी सर्व चेक नाक्यावर कोविड तपासणी केंद्र उभारली असून या केंद्रामार्फत कोरोनाची चाचणी केली जात आहे. गोव्याच्या जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.