बांबवडे (प्रतिनिधी) : सावे (ता.शाहूवाडी) येथील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध बांबवडे येथे करण्यात आला. तसेच या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य तो तपास करावा, अशा मागणीचे निवेदन शाहूवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने  देण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी,  जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीराव पाटील, संपर्कप्रमुख आनंद भेडसे, दिनकर लोहार, सचिन मुडशिगंकर, विजय लाटकर, तुषार पाटील, शरद निकम, अमोल डवंग, महिला आघाडीच्या अलका भालेकर, सुवर्णा दाभोळकर, पूनम भोसले, कल्याणी शिंत्रे, पल्लवी बाऊचकर, संगिता झेंडे, जानकी कुंभार, प्रिया कुंभार, अनिल पाटील (शाहीर) विठ्ठल मांगुरे, बाजीराव पाटील, वरेवाडीचे उपसरपंच आनंद भोसले आदीसह  शिवसैनिक उपस्थित होते.