गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२१’ च्या यादीत गडहिंग्लज नगरपरिषदेला १४ वे स्थान मिळाले आहे. तर पश्चिम विभागात नगरपरिषदेने नववा क्रमांक पटकावला आहे. आज दिल्ली येथे आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा स्वाती कोरी आणि मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी पारितोषिक स्विकारले. छत्तीसगडचे नगरविकासमंत्री डॉ. शिवकुमार डहरिया, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि जाँईट सेक्रेटरी रूपा मिश्रा आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, गेल्यावर्षी या स्पर्धेत गडहिंग्लज नगरपरिषद देशाच्या यादीत १३ व्या स्थानावर तर पश्चिम विभागातील सहा राज्यामध्ये सहाव्या स्थानावर होती.