कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या मुद्रणालय कर्मचाऱ्यांकडून आज पंचगंगा स्मशान भूमीला पाच हजार पाचशे एक रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला. निधीचा धनादेश आयुक्त डॉ. एम. एस. कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मुद्रणालयाच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी हा निधी दिला. शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष कै. व्ही. आर. पाटील आणि विद्यमान अध्यक्ष बाबा सावंत यांच्या प्रयत्नातून या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत आहे. त्यांच्या कृतज्ञेपोटी निधी संकलन करून तो स्मशानभूमीला प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रताप पवार, जे. जी. कदम, प्रकाश घाग, रविंद्र निंबाळकर, प्रभाकर मोहिते, सतीश घाटगे, शेखर खामकर, नितीन घाटगे, अनिल गायकवाड, सुरेश रहाटवडे, आर. जे. खाडे आदी उपस्थित होते.