कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच सण सध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे यावर्षी नवरात्रोत्सवही साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. पण उत्सवातील सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडणार आहेत.

कोल्हापुरातील छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे भवानी मंडपात आज (रविवारी) फलाहार रूपातील पूजा बांधण्यात आली. दसऱ्यानिमित्त विविध रूपातील पुजा बांधण्यात येते. रविवारी फलाहार रूपातील पुजा बांधून भाविकांचे लक्ष वेधले.