कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवशक्ती प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाडा, सरनाईक कॉलनी शाखेच्या वतीने वीर शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल (मंगळवारी) मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५० पेक्षा जास्त जणांची तपासणी करण्यात आली.

सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशाला येथे आयोजित केलेल्या शिबिरात मान्यवरांच्या हस्ते सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन झाल्यानंतर शिबिराला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागांतून आलेल्या ५० पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

डॉ. अनिकेत पाटील यांच्या ओम क्लिनिक व सौ. सविता डांगे यांच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवशक्ती प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाडाचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, अमोल माने, चेतन मोहिते, स्वप्निल पाथरूट, शहाजी सूर्यवंशी, महादेव मोरे, आनंदराव माने, ॲड. धनंजय बोरगावकर, प्रतिष्ठानचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.