मध्य प्रदेश : आजकाल कॉंग्रेसचे राजपुत्र माझ्यावर रोज टीका करतात.त्यात त्यांना मजा येते.ते काहीही बोलतात.सोशल मीडिया आणि टीव्हीवरील लोक म्हणतात की, पंतप्रधानांसाठी असं बोलणं योग्य नाहीये. मोदीवर अशा पद्धतीने टीका केल्याने जनता दु:खी आहे.तुम्ही दुखी होऊ नका. ते प्रसिद्ध आहेत, पण आम्ही कामगार आहोत. भविष्यात ते खूप बोलतील. तुम्ही तुमचं डोकं खराब करू नका. त्यांच्या टीका सहन करण्यासाठीच आम्ही जन्मालो आहोत, भाजपसाठी देशापेक्षा मोठं काहीही नाही. पण कॉंग्रेससाठी  त्यांचे कुटुंब सर्वस्व आहे,अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींनी आज मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका सभेला संबोधित केलं. या सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात मध्यप्रदेश राज्याला एका आजारी राज्यांच्या रांगेत उभं केलं होतं असंही मोदी यावेळी म्हणाले.यावेळी आरक्षणावरुन मोदींनी  काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. त्यांनी कर्नाटकातील सर्व मुस्लिम समाजातील लोकांना ओबीसी म्हणून घोषित केले आहे. म्हणजे तिथे पूर्वी शिक्षणात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळायचं. पण काँग्रेसने ओबीसी प्रवर्गात इतके नवीन लोक आणले त्यामुळे ज्यांना आरक्षण मिळायला हवे होते, त्यांच्याकडून छुप्या पद्धतीने काढून घेतले गेल्याची टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.