कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटीच्या सिनिअर महिला संघासाठी निवड चाचणी प्रक्रिया छ्त्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, येथे बुधवारी (दि.१३) सकाळी ७.३० वाजता होणार आहे. तरी इच्छुकांनी निवड चाचणीस उपस्थित रहावे, असे आवाहन संघ व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

फूटबॉल मध्ये राज्य आणि राष्ट्रीय इंडियन वुमन्स लीग लुधियाना व बेंगलोर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी संघाने नावलौकीक मिळवला आहे. विफा वुमन्स फुटबॉल लीग २०२१-२२ या स्पर्धेसाठी इंडीयन वुमन्स लीग पात्रता फेरी करीता महिलांचा संघ निवडला जाणार आहे. तरी ज्या खेळाडुंची जन्मतारीख ३१ डिसेंबर २००५ पूर्वीची आहे, अशा खेळाडूंनी निवड चाचणीला बुधवारी सकाळी ७.३० वाजता छ्त्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे उपस्थित रहावे, असे आवाहन फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटीच्या वतीने करण्यात आले आहे.