कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर खाजगी दवाखान्यात कोरोनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यांनी शासकीय नियमाप्रमाणेचं बिलाची आकारणी करावी, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगर अध्यक्ष चेतन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दरम्यान, खाजगी दवाखान्याकडून अवाजवी बीलाची आकारणी करून आर्थिक फसवणूक होत असेल तर संबधितांनी प्रविण पाटील ९४२२६२९९४८,चेतन पाटील ९८६०५९८५८५ या नंबरशी संपर्क करावा, असे आवाहन ही करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. तर हाताला काम नसल्याने लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. त्यातच कोरोनाच्या नावाखाली अनेक खाजगी दवाखान्याकडून मोठ्या प्रमाणात बीलाची आकारणी करण्यात येत आहे. सरेआम आर्थिक लुबाडणूक चालली आहे. त्यामुळे रुग्ण दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. तरी खाजगी दवाखान्यात होणारी आर्थिक खाजगी दवाखान्यात कोरोनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यांनी शासकीय नियमाप्रमाणेचं बिलाची आकारणी करावी. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष शिवाजी खोत, प्रविण पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष हिंदूराव हुजरे पाटील, राजू सावंत, चंद्रकांत पाटील, सुधाताई सरनाईक, अनिता जाधव, सुनीता पाटील उपस्थित होत्या.