पुणे (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडल आहे. शिरूरच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोडी लिपी संशोधन करणारे पथक शिरूर दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे वडील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते. नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मनोज जरांगेंच्या जरांगे कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती सोमर आली होती. जिथून मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली, त्या अंतरवली सराटी गावातच एकही कुणबी नोंद न्या. शिंदे समितीला आढळली नव्हती. न्या. शिंदे समितीनं राज्यभरातून हजारो कुणबी नोंदी शोधून काढल्या होत्या. मात्र, जरांगेंच्या गावातच समितीला एकही नोंद आढळली नव्हती.

त्यामुळं मनोज जरांगे, त्यांचे कुटुंबीय आणि अंतरवाली सराटीचे गावकरी देखील आरक्षणापासून वंचित राहणार का ? अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता नोंदी सापडल्यामुळे मनोज जरांगे, त्यांचे कुटुंबीय आणि अंतरवाली सराटीचे गावकरी यांना दिलासा मिळाला आहे.