कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील कसबा बावडा ते वडणगे मार्गावरील पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावरून कार थेट नदीच्या पाण्यात रविवारी कोसळली होती. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून, पोहत नदीचा काठ गाठल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. मात्र, ही गाडी नदीच्या प्रवाहात वाहून गेली होती. आज (मंगळवार) ही गाडी नदीपात्रातून कावळा नाका येथील अग्निशामक दलाच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढली.