कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर मेनरोडवरील हॉटेल डायट डीलाईटसमोर पार्क केलेल्या कारना दुसऱ्या कारने धडक दिल्याने झालेल्या वादावादी आणि भांडणांमध्ये परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून कारचालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कैलास नारायणदास सुंदराणी, सागर नारायणदास सुंदराणी (दोघेही रा. गांधीनगर), वैभव बळवंत व्हनागडे (रा. लाची शिरोली आणि अज्ञात दोघे)  कारचालक पवन वलेचा (रा. गांधीनगर), धीरज प्रकाशलाल संतांनी व कैलास नारायण सुंदराणी (दोघेही रा. गांधीनगर) यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.

संतानी यांच्या फिर्यादीनुसार, कैलास नारायणदास सुंदरानी आणि सागर नारायणदास सुंदरानी (दोघेही रा. गांधीनगर) यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून संतोष राजकुमार लालवाणी (रा. गांधीनगर) हे कारच्या धडकेत जखमी झाले.

कैलास सुंदराणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आपल्याला काठीने मारहाण केल्याबद्दल वैभव बळवंत व्हनागडे (रा. शिरोली पुलाची) आणि अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत कैलास व सागर नारायणदास सुंदराणी (दोघेही रा. गांधीनगर) जखमी झाले आहेत.

गांधीनगर मेन रोडवरील हॉटेल डिलाइटमध्ये धीरज प्रकाशलाल संतानी हे मित्रासोबत जेवण्यासाठी कार हॉटेलसमोरील रस्त्याच्याकडेला उभी करून गेले होते. तिथे पवन वलेचा (रा. गांधीनगर) या कारचालकाने बेदरकारपणे कार चालवून संतांनी यांच्या कारसह अन्य दोन कारना धडक दिली. तिथे वादावादी, भांडणे आणि मारामारी झाली. कैलास नारायणदास सुंदरानी व सागर नारायणदास सुंदरानी यांनी संतांनी यांचे मित्र वैभव व्हनागडे यांना मारहाण केली. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यांमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दिल्याने सहा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.