हमिदवाडा (प्रतिनिधी) :   यमगे (ता.कागल) येथे शेतजमिनीवरून झालेल्या वादात अशोक पाटील व उत्तम पाटील या दोन भावांच्या कुटुंबात मारामारी झाली. यात सात जण जखमी झाले असून मुरगूड पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून उत्तम पाटील, विठ्ठल पाटील, महादेव पाटील व गजानन पाटील यांनी आपल्यासह पत्नी व मुलास मारहाण केल्याचे म्हटले आहे. तर उत्तम पाटील यांनी अशोक पाटील, दिगंबर पाटील, अजिंक्य पाटील व सुवर्णा पाटील यांनी मुलगा महादेव व भाऊ विठ्ठल व पुतण्या गजानन पाटील यांना मारहाण केल्याचे परस्परविरोधी तक्रारीत म्हटले आहे.