गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात अवकाळी पावसाने ऊस, भात पिके जमीनदोस्त झाली आहेत. या पिकांची ताबडतोब पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी दिला आहे.

याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी आडसुळे यांना दिले आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे, भात पीक पूर्ण पणे खराब झाले असून यापुढे जनावराच्या वैरणीचा फार मोठा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. यापूर्वी वादळी पावसाने ऊस पिकाचे तर आता भात पिकासह अन्य पिके कुजून गेली आहेत. याचा ताबडतोब प्रशासन विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी केली आहे.

यावेळी रमेश देसाई, धनाजी पाटील, सुरेंद्र धोंगडे, संदीप पाटील, संजय घरपणकर, सदाशिव आरेकर, पांडुरंग कल्याणकर आदी शेतकरी उपस्थित होते.