नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजतक वाहिनीचे प्रसिद्ध अँकर रोहित सरदाना यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या निधनामुळे मीडिया क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

आपण रुग्णालयात उपचार घेत आहोत,  सोबतच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याची पोस्ट त्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केली होती. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. त्यांची ऑक्सिजनची पातळीदेखील बरीच कमी झाली होती. त्यांचा तापही कमी होत नव्हता. अखेर त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. कनुप्रिया या उत्तम अभिनेत्रीही होत्या. त्यांच्या निधनामुळे मीडिया क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, न्यूज अँकर रोहित सरदाना यांचेही एक दिवसापूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे.  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.