मुंबई (प्रतिनिधी) : फडणवीस तुम्ही या गोंधळात पडू नका. पुन्हा एकदा सकाळी जे काही घडले होते, ते संध्याकाळी होऊन जाईल. तुमची जी काही शिल्लक प्रतिष्ठा आहे, ती सांभाळून ठेवा. या गोंधळात तुम्ही पडू नका. आमचे आम्ही बघून घेऊ; अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना पक्षासाठी शेकडो लोकांनी आपले बलिदान दिले असून, आमच्या रक्तापासून शिवसेना तयार झाली आहे. भाजप पैशांच्या जीवावर शिवसेना विकत घेऊ शकत नाही, अशी टीका देखील राऊतांनी भाजपवर केली.

शिवसेना पक्षासाठी शेकडो लोकांनी आपले बलिदान दिले असून, आमच्या रक्तापासून शिवसेना तयार झाली आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. आजही हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेला कुणीही हायजॉक करू शकत नाही, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला आहे.