कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर निवृत झाले. त्या निमित्य कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कॉ. जाहिर निकम, सदलगेकर, कॉ. एस. बी. पाटील, कॉ. शंकर पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाला.

डी. व्ही. घाणेकर म्हणाले की, गेली सत्तेचाळीस वर्षे डेअरी व्यवसायामध्ये काम करत असताना विविध ठिकाणी आलेल्या अनुभवातून व डॉ. कुरियन यांच्या मागदर्शनाने काम केले. दूध उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी मानून काम केले. ३५ वर्ष एनडीडीबीमध्ये विविध राज्यामध्ये काम केले. या कामाच्या अनुभवावर गेली १२ वर्ष गोकुळ दूध संघात काम करताना विविध योजना राबवून दूध उत्पादकांना जादा दर मिळणे तसेच त्यांना केलेल्या काबाडकष्टाने उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने काम केले.  कर्मचारी, अधिकारी यांना सोबत घेवून संघाच्या संचालक मंडळाच्या दृष्टीने संघाची उन्नती व्हावी हेतूने काम केले आहे.

कॉ. सदलगेकर म्हणाले की, निवृत्तीनिमित्त हा केवळ सत्कार नसून कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.

यावेळी कॉ. शंकर पाटील, कॉ. संजय सावंत, कॉ. के. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, विक्रम कदम संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.