जळगाव (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज (बुधवार) भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आपणही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.  

रोहिणी खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे. विधानसभा निवडणुकीत स्वपक्षातील नेत्यांनीच आपल्याविरुद्ध प्रचार केला. त्यामुळे माझा पराभव झाला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याचे पुरावे देऊनही दोषींविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही खडसे यांनी केला आहे.