पुणे ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रची सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे आणि पुण्यातील कोथरूड परिसर म्हणजे कलाकारांचे महेर घर म्हंटल तर वावगं ठरणार नाही. अनेक कलाकार, रसिक, लेखक, साहित्यिक या परिसरात राहतात. कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडून कोथरुडकरांना नवनवीन कला सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच सांस्कृतिक मेजवानी मिळत असते.

बुधवार, दि 22 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 4 वा बाणेर मधील बंटारा भवन येथे प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित तसेच सरगम प्रकाशित “एका लग्नाची, पुढची गोष्ट” या सुप्रसिद्ध नाटकाचा मोफत प्रयोग चंद्रकांत पाटील यांच्या वतीने नागरिकांसाठी ठेवण्यात आला आहे. याबाबत सोशल मीडिया पोस्ट द्वारे चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. कोथरूडकरांचा आनंद हा नेहमीच प्राधान्यक्रम असतो.

यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. कोथरुडकरांचे निखळ मनोरंजन हाच एकमेव हेतू यामागे आहे. बाणेर येथील बालेवाडी फाट्याजवळील पाटील यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रयोग पाहण्यासाठीचे मोफत पासेस उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग कोथरूडकरांना निशुल्क असून कोथरूडकरांनी या निखळ मनोरंजनाचा आनंद घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले.

एका व्यक्तीस 4 पासेस देण्यात येणार असून त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. 20 तसेच 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत हे मोफत पासेस बालेवाडी फाट्याजवळील चंद्र्कांनी पाटील यांच्या संपर्क कार्यालयात उपलब्ध असणार आहेत.