वारणानगर (प्रतिनिधी) ; रामनवमीचे औचित्य साधत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांनी वारणानगर, वाठार परिसरांतील रामनवमींच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांतील नेतेमंडळी, कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी सर्वांनीच धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत प्रभू श्रीराममंदिराची उभारणी करून हिंदूऱ्हदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले आहे. या स्वप्नपूर्तीनंतरची ही पहिलीच रामनवमी असल्याने या रामनवमीला देशवासीयांच्या दृष्टीने विशेष महत्व असल्याचे नमूद करून खा. धैर्यशील माने यांनी यावेळी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच खा माने यांनी नवे पारगाव, वाठार, किणी येथील रामनवमीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत प्रभू श्रीरामांचा आशिर्वाद घेतला.

त्यानंतर त्यांनी वारणा दूध संघाचे संचालक प्रदिप देशमुख, वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजीतात्या पाटील, वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे आणि शरद बेनाडे यांच्याशी व त्यांच्या कार्यकर्त्यांशी आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने चर्चा केली.

यावेळी सर्वच नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी माने यांना एकमुखी पाठिंबा व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणूक ही देशाला दिशा देणारी निवडणूक असल्याने कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यांसाठी खासदार धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार सर्वांनीच व्यक्त केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपा राष्ट्रवादी शिवसेना व महायुतीच्या मित्र पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी सुपात्रे (ता. शाहूवाडी) येथे माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त शाहुवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

यावेळी माजी खासदार निवेदिता माने, गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड, योगिराज गायकवाड, तालुकाप्रमुख विजय देसाई, दिग्विजय गायकवाड, माजी सभापती महादेव पाटील, विष्णू पाटील, सुरेश पाटील, प्रशांत कुलकर्णी, बाजीराव निकम शिवाजीराव सांगळे, भरतराज भोसले, इंद्रजीत इनामदार, बाळासाहेब गद्रे, सुरेश पाटील, पारगावचे प्रदीप देशमुख, सुरेश पवार. उपस्थित होते.