मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे खा. संजय राऊत यांना जमीन घोटाळ्यात संबंधित समन्स बजावण्यात आले आहे. या आधी त्यांची दादरस्थित मालमत्तेची चौकशी करण्यात आली होती. काही ठिकाणी छापे टाकून ईडीने मालमत्ताही ताब्यात घेतली.

राऊत यांच्या पत्नीच्या नावे झालेल्या व्यवहारांवरही संचलनालयाची नजर आहे. सध्या राज्यात सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. यातच सेनेचे मंत्री अनिल परब यांची सलग तीन दिवस ईडी चौकशी पार पडली. यानंतर आता संजय राऊत यांचा पाय खोलात गेल्याने सेनेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी संजय राऊतांवर ही कारवाई केली जात आहे. दरम्यान, यामुळे बंड सुरू असतानाच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अद्याप नोटीस माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही असे राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे; मात्र उद्या पूर्वनियजित सभा असल्याने ईडीकडे वेळ वाढवून मागू असे त्यांनी सांगितले आहे.