कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत पुन्हा वाढ झाली आहे.  मागील चोवीस तासांत १८२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १७१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण १७,६०० हून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४०९ तर करवीर तालुक्यात ४०१ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ४०९, आजरा- ७१, भुदरगड- २७, चंदगड- ७, गडहिंग्लज- ४१, गगनबावडा – ९, हातकणंगले – १४६, कागल- ९३,  करवीर- ४०१, पन्हाळा- ११५, राधानगरी- ५८, शाहूवाडी – ११६, शिरोळ – १६६, नगरपरिषद क्षेत्र- १३७, इतर जिल्हा व राज्यातील- २४ अशा १८२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ६१, १६७ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ४२, ३५१  

मृतांची संख्या , ८१०

उपचार सुरू असलेले रुग्ण १४, ००६