कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी १ डिसेंबररोजी मतदान होत आहे. उमेदवारांनी मतदारांशी गाठीभेट घेत आपला प्रचार गतिमान केला आहे. परंतु काही उमेदवारांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या फोटोचा वापर करून प्रचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर संभाजी राजे यांनी ट्विट करून फोटोचा वापर करण्यात येऊ नये, असे म्हटले आहे.  

संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून या निवडणुकीत काही उमेदवार माझ्या संमतीशिवाय माझ्या फोटोचा वापर करून प्रचार करीत आहेत. कोणत्याही उमेदवाराने माझ्या फोटोचा प्रचारासाठी वापर करू नये.