अमरावती (प्रतिनिधी) : देशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. यामुळे कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा’, असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.
ते म्हणाले, केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलू नये. कांदाचे भाव वाढले पाहिजे कारण ७० वर्षाचा अनुशेष आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी मुळा, लसूण खावा. कांदा शेतकऱ्यांचा नसून आयात केलेला कांदा आहे. मग आयात केलेल्या कांद्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ?