कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील विश्वविक्रमवीर सुरेश पांडुरंग सुतार यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी यांच्याद्वारे दिल्ली येथे सोशल कौन्सरन्स पदवी देऊन गौरविण्यात आले.

सुरेश सुतार यांच्या नावावर लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०००, ओ.एम.जी.बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२० आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारतातील बारा व्यक्तींमध्ये सुतार यांची निवड करण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. विविध क्षेत्रात सामाजिक कार्याने प्रभावित होऊन साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने सुरेश सुतार यांना सोशल कौन्सरन्स पदवी प्रदान केली.

यावेळी युनिव्हर्सिटीचे चान्सलर जॉन पिटर, आपचे मंत्री सोमनाथ भारती, भाजपा दिल्ली प्रवक्ता सतीश उपाध्याय, विनय चौधरी, अभिनेते सुरेंद्र पाल, उद्योगपती सुभाष जिंदाल आदी मान्यवर उपस्थित होते.