बोरपाडळे (प्रतिनिधी) : १३ फेब्रुवारी हा राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त बोरपाडळे येथील विद्या मंदिर शाळेमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेन्द्र गायकवाड यांनी, जंतनाशक गोळीचे आणि स्वच्छतेचे महत्व सांगितले. तर डॉ.अहिल्या कणसे यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गोळी सेवन करण्याचे तसेच त्यानंतर काही अडचण आल्यास तत्काळ वैद्यकीय विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले. तसेच अनिल मोरे यांनी प्रत्यक्ष गोळी कशी घ्यायची याचे प्रात्यक्षिक दाखवले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, पन्हाळा तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेन्द्र गायकवाड, समुदाय आरोग्याधिकारी डॉ. अदिती देसाई, पर्यवेक्षक संपत पाटील, गोपाळ पाटील, अपर्णा बोरकर, प्रणाली महापुरे, तेजस जगदाळे आदी उपस्थित होते.