कळे (प्रतिनिधी) : मावस मामाने अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निलेश नामदेव पाटील (रा. काटेभोगाव, ता. पन्हाळा) याच्याविरोधात कळे पोलीस ठाण्यामध्ये आज (बुधवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसरूळ (ता.पन्हाळा) येथील १४ वर्षीय पीडित बालिका आपल्या मावशीकडे विरार (मुंबई) येथे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत आरोपींनी जबरदस्तीने बालिकेसोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडित बालिका गर्भवती राहून तिने एका मुलीला जन्म दिला. या प्रकरणी पीडितेने कळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.