कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात २०३.५१ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, राजाराम, सुर्वे, रुई, तेरवाड व शिरोळ, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- वाघापूर, निळपण, शेणगाव, म्हसवे, गारगोटी, कुरणी, बस्तवडे व चिखली, कुंभी नदीवरील- कळे, शेणवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड, भोगावती नदीवरील- हळदी व राशिवडे, वारणा नदीवरील- चिंचोली असे २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी २०३.५१ दलघमी., तुळशी ८०.८९, वारणा ८१४.८६, दूधगंगा ५५७.८३, कासारी ६३.५१, कडवी ६३.६९, कुंभी ६३.५५, पाटगाव ९०.१५, चिकोत्रा ३७.७९, चित्री ५१.६७, घटप्रभा ३४.६५, आंबेआहोळ ३०.९८, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे : राजाराम २४ फूट, सुर्वे २५.६, रुई ५४.३, इचलकरंजी ५१, तेरवाड ४५.३ शिरोळ ३५, नृसिंहवाडी ३३.९, राजापूर २०.४ अंकली ११.४ फूट अशी आहे. करंजफेण व कांटे शिवजवळ वारंग मळी येथे पाणी आल्याने कोल्हापूर-राजापूर वाहतूक बंद झाली आहे. बर्की पुलावर पाणी आल्यामुळे बर्कीचा धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.