मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्षांचे सभा प्रचार पाहायला मिळत आहे. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. वरिष्ठ नेते एकमेंकावर निशाणा साधण्याचा एक ही संधी सोडत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. इतके वर्ष राजकारण केलं, पण विदर्भाला काही दिलं नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केली आहे . महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते..

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस..?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परवा शरद पवार आले होते. शरद पवार म्हणाले, मागच्या वेळेस नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता याबद्दल माफी मागतो. तुम्हाला माफी मागायची असेल तर विदर्भाची मागा, कारण तुम्ही सातत्याने विदर्भावर, अमरावतीवर अन्याय केला. तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवलं. मोदींच्या नेतृत्वात आज या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आलं. मोदींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशन सौंदर्यकरण आलं. मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी अनेक गोष्टी आल्या. त्यामुळे तुम्ही माफी मागितलीच पाहिजे, पण जनेतेची मागितली पाहिजे. इतके वर्ष राजकारण केलं, पण विदर्भाला काही दिलं नाही”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

.