सावरवाडी (प्रतिनिधी) : सणासुदीच्या काळात ग्रामीण भागात फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. ऐन दसरा दिपावली सणाच्या आगमनाची चाहूल लागल्याने बाजारपेठेत झेंडू फुलांना मागणी वाढत आहे. यंदाच्या ऑक्टोंबऱ महिण्यात २०० ते ३०० रुपये प्रति किलो या मिळणाऱ्या बाजारभावामुळे करवीर तालुक्यात शेतीमध्ये झेंडूची लागवड करण्यात येत आली आहे.
करवीर तालुक्यातील सावरवाडी, गणेशवाडी, बहिरेश्वर, हिरवडे दुमाला,बाचणी, म्हारुळ आदी परिसतील दोनशे एकर शेतीमध्ये झेंडूची लागवड करण्यात आली आहे. बेळगाव, रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी बाजारपेठेत झेंडू फुलांची आयात होत असते. सणासुदीच्या हंगामात झेंडू फुलांतून आर्थिक नफा शेतकऱ्यांना मिळत असतो. दसरा दिपावली सणाच्या आगमनाने झेंडू फुलांना चांगला दर मिळतो.