कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन आज (मंगळावर) उत्साहात साजरा करण्यात आला.

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, डी वाय पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्या हस्ते वि.वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुस्तक प्रदर्शन व भित्तीपत्रिका प्रदर्शन कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कुलगुरू डॉ. मुदगल म्हणाले, मराठी भाषेला समृद्ध परंपरा लाभली आहे. आपल्या मातृभाषेबरोबरच राष्ट्रभाषेचाही देखील आपण आदर करावा.

तसेच डी. वाय. पाटील गृपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के .गुप्ता यांनी, मराठी भाषेने साहित्य क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याची आवड जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रंथालय विभाग व व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आसावरी यादव, डॉ.स्नेहल शिंदे, विभाग प्रमुख अभिजीत मटकर, डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई, ग्रंथपाल अक्षय भोसले, रोहन बुचडे, संकेत लांडगे, नवनाथ कुरणे, विद्यार्थी उपस्थित होते.