कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ २२ मार्च रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.यावेळी के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ, बेळगावीचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत.

तसेच स्पाईन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शेखर भोजराज यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) तर क्रीडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आर. ए. पाटणकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लीट.) या पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया सभागृहात सकाळी ११ वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तसेच एकूण 605 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी 11 विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार आहे. विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ.जहागीरदार, डॉ. विनय वाघ आणि डॉ. मिलिंद सबनीस यांच्या नावाने पारितोषिके दिली जाणार आहेत.

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी डी लोखंडे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. राजेश ख्यालाप्पा, उपस्थित होते.