दादरा नगर हवेली  (वृत्तसंस्था) : दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर रिक्त  झालेल्या दादरा नगर हवेली लोकसभा  मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे.  शिवसेनेच्या  उमेदवार कलाबेन डेलकर यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार  निवडून आल्याने हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे. 

कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहेत. मोहन डेलकर हे भाजपचे खासदार होते. त्यांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबीय भाजपवर आरोप करत बाहेर पडले आणि शिवसेनेने पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.

कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार  ८३४ तर भाजपच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मते मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला आहे.