टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कापूरवाडी येथील युवराज खोत यांच्या एचएफ-९० या जातीच्या गायीला लम्पी साथीच्या आजारासारखी प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

देशात लम्पी या रोगाने थैमान घातले असतानाच हातकणंगले तालुक्यातील ही पहिलीच घटना निदर्शनास आली आहे. आपले पशुधन कसे सांभाळायचे, या काळजीने शेतकर्‍यांला ग्रासले आहे. याबाबत खबरदारी घेत सर्व शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांची आणि स्वत:ची काळजी घ्यावी, अशी सूचना पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. अलीकडेच शिरोळ तालुक्यात २५ जनावरांना लम्पीच्या साथीची लागण झाली आहे.