गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात आठवड्यात पुन्हा ९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. कोवीड सेंटरमध्ये २६ पॉझिटिव्ह व संशयित रूग्णावर उपचार सुरु आहेत. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रविवारी तालुक्यात १५ रूग्ण सापडले होते. त्यानंतर पुन्हा १० रुग्ण सापडले आहेत. मडिलगे बुद्रुक २, कोनवडे ४, गारगोटी, पिंपळगाव, हेदवडे येथे प्रत्येकी १ रूग्ण सापडले आहेत. आज (गुरूवार) गारगोटी आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. याशिवाय बहुतांशी दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनी काळजी न घेतल्यास रूग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. नागरिक तोंडाला मास्क न लावता मोकाट फिरत आहेत. मास्क न लावणार्‍या १२ नागरिक व व्यापार्‍यावर कारवाई करून दंड केला आहे.